Chosen Lines


नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुल केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात !वाऱ्यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे, चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध !

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट !

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग !

लावण्यवतींचा लालस येथे विलास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुल केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास !

गीत कुसुमाग्रज
संगीत सी. रामचंद्र
स्वर सी. रामचंद्र

पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली !मला आठवेना… तुला आठवेना …
कशी रात गेली कुणाला कळेना
तरीही नभाला पुरेशी न लाली !

गडे हे बहाणे, निमित्ते कशाला ?
असा राहू दे हात माझा उशाला
मऊमोकळे केस हे सोड गाली !

कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
अता राहू दे बोलणे, हालचाली !

तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली !

गीत सुरेश भट
संगीत रवि दाते
स्वर सुरेश वाडकर

पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू आशी घडे ही या दोन लोचनांचीपहिलीच भेट झाली, जडली अपूर्व बाधा
स्वप्नात गुंग झाली जागेपणात राधा
माझी न रहिले मी, किमया अशी कुणाची ?डोळे मिटून घेता दिसतोस तू समोर
फुलवून पंख स्वप्नी अन्‌ नाचतात मोर
झाली फुले सुगंधी माझ्याहि भावनांचीलाजून वाजती या अंगातुनी सतारी
ऐश्वर्य घेउनी हे ये दैव आज दारी
मी लागले बघाया स्वप्ने ही मीलनाची

वाऱ्यात ऐकतो मी आता तुझीच गाणी
ताऱ्यांत वाचतो अन्‌ या प्रीतिची कहाणी
पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची
जादू अशी घडे ही या दोन लोचनांची

गीत मंगेश पाडगावकर
संगीत श्रीनिवास खळे
स्वर सुमन कल्याणपूर, अरुण दाते

या मीलनी रात्र ही रंगली
तू दर्पणी पाकळी चुंबिलीटिपले ओठ मी, आली ही नशा
चल ये पाखरा, निजल्या या दिशा
तू-मी जागे, दुनिया झोपलीहळवे पाश हे, विळखा रेशमी
झरले चांदणे, भिजले चिंब मी
फुलले, गाते, प्रतिमा लाजलीविझली आग ही, विझला हा दिवा
अजुनी प्रियतमा, जवळी तू हवा
हलके, हलके, सुषमा जागली
गीत जगदीश खेबुडकर
संगीत सुधीर फडके
स्वर आशा भोसले, सुधीर फडके

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s