शाळा


हल्ली मी मराठी विशेष वाचायला जात नाही. वाचलेच तरी फक्त वर्तमानपत्र. पु ला किंवा ची वी जोशी यांच्या तोडीचे आधुनिक मराठी लेखन माझ्या अजून तरी पाहण्यात आलेले नाहीत. अर्थात असे लेखक नाहीत वगैरे म्हनाण्यापेक्ष्या  माझे वाचन कमी झाले आहेत असाच अर्थ यातून काढावा.

मराठी साहित्याचे भविष्य वगैरे विषय आज काल अति वापरणे गुळमुळीत झाले आहेत पण मिलिंद बोकिलांची “शाळा” हि कादंबरी वाचून मात्र  उगाच  मराठीच्या भवितव्याच्या नावाने बोंब मारण्याची गरज नाही हे मात्र मला स्पष्ट वाटले. लोग काहीही म्हणोत पण मला चेतन भगतची काही पुस्तके फार आवडली होती. भूतकाळातील काही हरवलेले क्षण त्याच्या पुस्तकातून मला परत भेटले होते.

पु ला सारख्याचे साहित्य हे अजरामर असते. चेतन भगत सारख्याचे साहित्य हे क्षणिक सुख देणारे उथळ पण मनोरंजनात्मक. मिलिंद बोकिलांची शाळा हि  कादंबरी ह्या  दोघांच्या  मध्ये  कुठे  तरी वास  करून  आहे.

Teenage romanceची आयीस फ्रूट सारखी हवी हवीशी वाटणारी थंड आणि गोड चव त्याला आहेच पण Fame is the fragrance of heroic deeds ह्या english सुवाचना च्या प्रभावाखाली बेन्द्रेबाई कडून मुकुंद जेव्हा छड्या खातो तेव्हा कादंबरीत depth सुद्धा आहे हि जाणीव आम्हाला होते.

कादंबरीचा नायक मुकुंद जोशी हा इयत्ता नववीतील एक विद्यार्थी. आपण त्याच्याशी चटकन relate करू शकतो. कारण साने गुरुजीच्या कथा प्रमाणे मुकुंद एक innocent विध्यार्थी नाहीये. तसा तो डाम्बिस सुद्धा नाहीये. पण त्याचे मित्र बिनधास्त “भेन्चोत” वगैरे शिव्या देतात. मेनका मासिक वाचनालयातून आणून मुकुंद आणि त्याचे सवंगडी त्यातील “त्याने लीलाला उचलून पलंगावर टाकले आणि तो तिचे उरोज कुस्करू लागला” हे गुपचूप वर्गात वाचतात.

मुकुंद शिक्षणात बऱ्यापैकी आहे, चित्र्या हा हुशार मुला पैकी एक. सूरया, फावड्या वगैरे बाद मुला पैकी अशी हि विरोधाभासी मुलांची टोळी. इंदिरा गांधीनी देशात लावलेली आणीबाणी. मुकुंदाची अंबाबाई हि मोठी बहिण व आयीसाहेब म्हणजे मुकुंदाच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आणीबाणी लावणार्या इंदिरा गांधी.

अशात मुकुंदाच्या सर्व मित्रांना कुणी नाही तरी कुणी मुलगी आवडते. त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना ते प्रेमच वाटते. आपली तथाकथित प्रेयसी सोडली तर इतर प्रत्येक मुलीला तेह वर पासून खाली पर्यंत न्याहाळत व त्या वर commentry करत बसतात.

मुकुंद मात्र हुशार आहे. त्याला मनातल्या मनात शिरोडकर आवडते पण तोह कुणालाच थांगपत्ता लागू देत नाही.

संपूर्ण कादंबरीत मुकुंद शिरोडकर विषयी स्वताला वाटणाऱ्या भावनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. निव्वळ तिच्या उपस्थितीतच त्याच्या मनाला समाधान लाभते. का ते ठावूक नाही पण “चित्रवीणा” हि कवितेचा अर्थ त्याला तिच्यामुळेच मनमोहक वाटतो. वर्गातून दिसणारे डोंगर ह्यांनी जांभळ्या रंगाचा कोट घातलाय असे वाटू लागते.  अन अशाच एके दिवशी शिरोडकर कडे मैत्री झाल्यावर इयत्ता नववीच्या मुकुंदाला वाटते कि

“त्या दिवशी मला कळल कि शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बांक आहेत,पोरपोरी आहेत, सर् आहेत, गणित आहे, भूगोल आहे , नागरिकशास्त्र सुद्धा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गायीच्या पाठीवर बसणार्या पांढर्या पक्ष्यां सारखे मुक्त आहोत. ह्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते, खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत; पण त्यातल शिकण मात्र सुंदर आहे.”

कथेत आपण नकळत गुंतून जातो. मुकुंदाच्या जाग्यावर स्वतःला बघतो. आपली सुद्धा कोणीतरी शिरोडकर असतेच. आपण सुद्धा तिचा पाठलाग केलेला असतो, कुणी बघत नाहीसे बघून टक लावून तिच्याकडे पाहिलेले असते. काही भाग्यवान लोकांना आपल्या शिरोद्कार्शी बोलण्यचे भाग्य लाभलेले असते. कुठल्यातरी पिंपळाच्या पारा खाली न बोलता एकत्र घालवलेले क्षण आणि कुणी बघेल व घरी सांगील म्हणून झालेली जीवाची घालमेल दोन्ही आठवते. आपण त्या वेडाला प्रेम समाजालेलो असतो आणि कधीतरी नकळत हे सारे क्षण अचानक आपल्या आयुष्यातून विस्मृतीच्या गर्तेत गेले असतात. निव्वळ आठवण सुद्धा आपल्याला दुधाच्या पावसा प्रमाणे वाटते किंवा चित्रवीणा कविते सारखी.

निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी
कुठे गर्द बांबूची बेटे

5 thoughts on “शाळा

  1. Tooo good. ह्या WeekEndला ह्या पुस्तकाचा शोध घेऊन वाचयचा प्रयत्न करतो .

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s