Blast from past : Da vinci code Indian version


रामायण महाभारत भारतीय लोकांच्या मनातच रुजलेले आहे अशी समजूत आहे. त्यात सुद्धा राम आणि रामायण ह्यांचा पगडा थोड़ा जास्तच आहे. बॉलीवुड पासून स्थानिक लोक-कला पर्यंत सर्व ठिकाणी रामायण आढळते. रामाची महती अशी सर्वत्र कशी पोचली ह्याचे आश्चर्य सर्वच विद्वंजनाना वाटते.

लेखकाने प्रस्तुत विषयावर फार रिसर्च केला आहे. रामाची पोपुलारिटी वाढली हा एक योगायोग नसून तय मागे एक मैनेजमेंट तत्वज्ञान आहे. जाणकार वाचकाना ठावुक असेलच की वल्क्मिकी महार्शिनी रामायण लिहून ते पोपुलर केले, पण त्यानंतर तुलसीदास ते समर्थ रामदास पर्यंत अनेकानी तो वारसा पुढे चालवला. पण हा योगायोग मुळीच नव्हता.

कोणत्याही संघटनेला जर आपले विचार लोकांमध्ये रुजवायाचे असतात तर सर्वप्रथम ते विचार लहान मुलांमध्ये रुजवायाचे असतात हे वल्मिकिनी ओळखलेले होते. त्यानी तर साक्षात् रामाच्यां मुलानाच गीत रामायण शिकवले. राहुल प्रियांकाचे बोबडे बोल जसे सर्व चैनल्सवर दाखवले जातात तसे लुव कुशच्या गीत-रामयाणाला सुद्धा भरपूर प्रसिद्धि मिळाली. रामावर पब्लिक प्रेशर अला व सीतामातेला रामाच्या महालांत पुन्हा प्रवेश मिळाला.

ज्या धोब्याच्या प्रचारामुळे रामाला सीतेला सोडावे लागले त्याचे नाव होते रजक. रामाविषयी त्याला घृणा होती व त्यामुळेच त्याने तो विषारी प्रचार केला होता. त्याने गुप्त रुपातुन संघटना बनवली होती. वाल्मीकिनी हा डाव ओळखुन तो आधीच हाणून पाडला. राजकाने ते फार मनाला लावून घेतले व वल्मिकिला त्याच्याच चालीने मात द्यायचे ठरवले. वाल्मीकि सुद्धा हे ओळखुन होते. त्यानी सुद्धा आपली एक गुप्त संघटना उभारली.

राजकाने तेव्हा पासून लहान मुलाना बडबड गीतांच्या मार्गाने आपले तत्वज्ञान द्यायला सुरुवात केलि. (चाणाक्ष वाचाकानी ओळखलेले असेलच की लेखकाने ह्या विषयावर फार रिसर्च केला आहे). ह्या संस्थेने आपली मुळे फार खोल वर रुजवलेली आहेत. विदेशांत सुद्धा ही संस्था पोचली आहे. आज आपण आपल्या मुलाना जी बालगीते शिकवतो ती सर्व बालगीते ह्याच संस्थेने बनवलेली आहेत (अणि आम्ही बनत आहोत).

येरे ये पावसा तुला देतो पैसा…ही लाचखावु वृत्ती शिकवणारे बालगीत निरागस आहे का? तो पैसा सुद्धा खरा द्यायचा नाही, ‘पैसा झाला खोटा’ ही तर खोटारडेपणाची परिसीमा आहे. हे बालगीत खरे म्हणजे आपण आपल्या मुलाना शिकवू नयेच.

नाही म्हणायला तुकाराम रामदास इत्यादि गरीब व पावरलेस मंडळीनी वल्मिकिची परम्परा चालवायचा अतोकात प्रयत्न केला.पण बिच्यार्यांची भाषाच एवढी बोजड की लहान मुलाना पाठ करायला ते कठिन जावू लागले. लव व कुश ही हुशार मुले होती, आश्रमात त्याना इतर काम धंदे नव्हते त्यामुळे त्याना गीत रामायण पाठ झाले. आताच्या मुलाना तुकाराम थोडेच समजणार ? तरी सुद्धा शाळा मास्तरांना ( हा एक निरुपद्रवी प्राणी असतो, कुणीही ह्याला हाताला धरून आपले काम साधतो, शेजार्याची प्रेम-पत्रे, सरकारचे नसबंदी धोरण, जनगणना इत्यादि अनेक कामे तो पार पाडतो) हाताला धरून दासबोध पाठांतर स्पर्धा वगैरे भरवुन ह्या मंडळी चे साहित्य रद्दीत जाण्यापासून वाचवले.

आता आपण इंग्रजी बालगीते बघुया. Jack and Jill Went Up the hill हे एक सुप्रसिद्ध बालगीत आहे. जैक हा तरुण मुलगा व जिल ही नुकतीच वयात आलेली मुलगी (बघा: चित्रमय बालगीते ऑक्सफोर्ड प्रेस) डोंगरावर जंगलात का जातात? पर्वतिवर जाणारे जोडपे नक्की कशासाठी जाते? सांगितले जाते की विहिरीतून पाणी काढायला गेले, पण विहीर कधी डोंगरावर असते का? आता जैक खालि पाडला की त्याला जिल ने धक्का दिला? दिला तर जैक ने असे काय केले म्हणुन त्याला धक्का दिला? मुलांची कोवळी curious मने ह्या प्रश्नाची उत्तरे शोधल्यावाचुन राहतील का ? इथे काही तरी पाणी मुरते हे त्यांच्या लक्षांत नक्कीच येईल.

नन्हें मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी में क्या है ….. हे बालगीत आहे कि सेक्स एडुकेशन चा धडा आहे ?

London bridge is Falling down हे आणखिन एक बालगीत. एखाद्या आतंक-वाद्याचे कृत्य असावे असे हे बालगीत कोणी लिहिले हे Interpole किंवा F.B.I. ने शोधून काढायला पाहिजे. कदाचित त्यातून ओसामा रजक धोब्याचा वंशज तर नाही ना ह्या विषयावर प्रकाश पडेल.

baba blackship have you any wool मी सुद्धा हे बालगीत पाठ केले होते. हे बालगीत वर वर निरागस वाटले तरी सुद्धा हे लक्षात घ्या की ह्यातील शीप हे ‘ब्लैक’ आहे व इतर तिघे ‘white’ आहेत. ह्यातून नकळत वर्णद्वेषाचा संस्कार मुलांवर होतो.

Johny Johny Yes Papa ह्याबद्दल जास्त बोलण्याची गरज नाही. साखर खायची व नंतर हाथ वर करायचे हा गुण जो राज-कारणात शिरलेला आहे त्याचे मुळ असल्या बालगीत-मध्ये आहे.

मराठी पुरते बोलायाचे जाले तर ‘गोरी गोरी पान’ ह्या गीतात वर्ण-द्वेष तर आहेच पण त्याशिवाय जे काहि आहे त्याचे रूपांतर सविता-भाभी सारख्या websites मध्ये झालेले आहे. मुळांतच भावाला आवड आहे त्यापेक्षा भाभी आणायची आवड ह्या मुलाला जास्त दिसते.

राम ही एक प्रवृति आहे व रजक ही एक प्रवृति आहे. रावण ही सुद्धा ही एक प्रवृति आहे व त्या प्रवृतिचा विरोध करणे सोपे सुद्धा आहे. पण रजक ह्या प्रवृत्तिचा विरोध करणे फार कठिन आहे.

टीप : लेखन विनोदी आहे. मनाला लावून घेऊ नये.

एपिलॉग :
२०१६: पैसा झाला खोटा ह्या निरागस(?) बालगीताची परिणीती (मराठीत : consequence ,चोप्रा नव्हे) मोदी महाशयांनी पैसा अक्षरशः खोटा करण्यात झाली. मोदी महाशयांनी पत्नीचा त्याग केला असला तरी वाल्मिकी सारख्यांच्या त्याचा गैर फायदा घेऊ नये म्हणून मुले निर्माण केली नाहीत.

२०१७: लंडन ब्रिज वर खरोखर हल्ला झाला. केले काळी “भो पंचम जॉर्ज भूप हा” अशी प्रार्थना जगभर मुलांना म्हणायला भाग पडणाऱ्या ब्रिटिश सत्तेच्या केंद्रबिंदूवरच हल्ला झाला. राजकाच्या दूरदर्शी नेतृत्वानेच हे शक्य झाले.

 

 

3 thoughts on “Blast from past : Da vinci code Indian version

 1. रजक त्याचे नाव नसून धोब्याला रजक असे म्हणतात. गुरुचरित्रात सुद्धा रजक हा शब्द आला आहे. तिथे तो त्या व्यक्तीचे नाव म्हणून नव्हे तर त्याचा व्यवसायवाचक असा तो शब्द आला आहे.

 2. Nilu Phule aka Maratha Strongman Pune University. maastaaaaar! saamanaa. sarkaari puraskaar.

  And how, and how, and how it all pierced my heart! (And how tender is my heart!!)

  (No emphases or quotes—whether the scare-quotes, or the ordinary ones, as used while quoting someone else—are being used here. After all, no punctuation using quotes can at all be used! The most punctuation allowed is: “|”. But not: “!”)

  _Maratha_ Stongman. Jitendra Arya. Innocence.

  And of course, I forgot to throw in the Saraswati, here and there. People populating her banks. Going elsewhere. Making money. Making friends. Influencing people. Grabbing prestige. Grabbing money. Subjugating others for one’s own power-lust.

  But, of course, I got carried away. … It _all_ was, now I learn, _only_ about money—errr… capital. Lots of it. Hopefully.

  May we get our money.
  May Ajit R. Jadhav be sacrificed.
  May we get our money.
  May we get our money.
  May we get our money.

  –Ajit
  This entire piece, in fact, is not only one of a piece but also humorous, by fiat, by self-declaration. Hence, if any one else takes an undue offense, it not only is, but only can be, his own personal responsibility. “dharma rakshatu…” etc. (I can use quotes; the main text is over.)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s